१५ दिवसांचा trial संपल्यावर काय होतं?
एजंट उत्तर देणं थांबवतो — पण तुमचे संदेश व leads कुठेही जात नाहीत, त्यांची नोंद चालूच राहते आणि पॅनलमध्ये तुम्हाला दिसतात. सुरू ठेवायचं असेल तर support@dbascale.com वर कळवा, आम्ही लगेच चालू करतो.
फक्त एकच एजंट घेता येईल का?
हो, आणि तसंच अपेक्षित आहे. बहुतेक व्यवसाय पहिल्या एजंटपासून सुरू करतात आणि काम वाढल्यावर दुसरा घेतात. तिन्ही एकदम घेण्याची सक्ती नाही.
करार किती महिन्यांचा असतो?
करार नाही. पगार महिन्याचा — नको असेल तेव्हा एजंट थांबवा. नोटीस-पिरियड नाही, दंड नाही.
पुढे किंमत वाढली तर माझ्यावर परिणाम होईल का?
नाही. तुम्ही आज जो दर घेता तो तुमच्यासाठी कायम तोच राहतो. वाढलेली किंमत फक्त नव्या ग्राहकांना लागू होते.
WhatsApp चा वेगळा खर्च येतो का?
ग्राहकाने मेसेज केल्यावर पुढचे २४ तास तुम्ही हवं तेवढं बोलू शकता — त्याचे Meta पैसे घेत नाही, आणि एजंटचं मुख्य काम तिथेच होतं. त्या खिडकीबाहेर स्वतःहून संपर्क करायचा असेल तर Meta-मंजूर template लागतो आणि त्याचे पैसे Meta घेते. हे आम्ही विक्रीच्या वेळीच स्पष्ट सांगतो — नंतरचं आश्चर्य नको.
किती संभाषणांची मर्यादा आहे?
वाजवी वापरावर मर्यादा नाही. एखाद्या व्यवसायाचा वापर असामान्य वाढला तर आम्ही आधी बोलून घेतो — बिल न सांगता वाढवत नाही.
पैसे कसे भरायचे?
trial संपायच्या आधी आमची टीम तुमच्याशी बोलून सोय करते. आत्ता पहिले ग्राहक आम्ही स्वतः हाताळत आहोत, म्हणजे प्रत्येकाशी माणूस बोलतो.
leads व ग्राहकांचे नंबर कोणाचे राहतात?
पूर्णपणे तुमचेच. ते तुमच्या पॅनलमध्ये असतात, तुम्ही ते कधीही निर्यात करू शकता, आणि आम्ही ते दुसऱ्या कोणालाही देत नाही.