पॅनलमधल्या Knowledge विभागात तुमची माहिती (PDF, Word, Excel, वेबसाइट, किंवा टाइप केलेला मजकूर) दिली की एजंट तीच वाचून ग्राहकाला अचूक उत्तर देतो — स्वतःहून काहीही रचत नाही.
PDF, Word (.docx), Excel (.xlsx), PowerPoint (.pptx), साधा मजकूर — प्रत्येक file कमाल 10MB. आणि तुमची website दिली तरी आम्ही ती वाचून आपोआप माहिती घेतो, वेगळं टाइप करावं लागत नाही.
ही माहिती AI ला "शिकवली" जात नाही — प्रत्येक ग्राहक-संदेशाला त्याच्याशी जुळणारा भाग तेवढ्यापुरता वापरला जातो. म्हणजे माहिती बदलली किंवा काढली, की उत्तरही लगेच बदलतं — पुन्हा काही "train" करावं लागत नाही.
किती document/storage ठेवता येतं हे तुम्ही किती एजंट कामावर ठेवले आहेत त्यावर ठरतं — एकही एजंट नसेल तर ३ documents/20MB, एक-दोन एजंट असतील तर ३० documents/500MB, तिन्ही एजंट असतील तर १०० documents/2000MB.
एका दस्तऐवजाला ठराविक प्रकल्प/सेवेशी जोडू शकता — म्हणजे ग्राहक एका विशिष्ट प्रकल्पाबद्दल विचारेल तेव्हा तेच योग्य कागद वापरले जातात.
Trial सुरू करून पहिला दस्तऐवज आत्ताच जोडा.
मोफत सुरू कराहे उत्तर उपयोगी वाटलं का?