WhatsApp Business Platform वर व्यवसायाला ग्राहकाला मनाला येईल तेव्हा संदेश पाठवता येत नाही — Meta चा हा नियम समजून घेणं गरजेचं आहे, विशेषतः तुम्ही स्वतःहून ग्राहकांशी संपर्क साधणार असाल तर.
ग्राहकाने संदेश पाठवला की पुढचे २४ तास तुम्ही (किंवा AI) त्याला हवं तितकं उत्तर देऊ शकता — हेच boliqAI चं मुख्य काम, आणि हे नेहमीच मोफत असतं.
ग्राहक २४ तास गप्प राहिला आणि तुम्हाला स्वतःहून (उदा. renewal-आठवण, ऑफर) पाठवायचं असेल, तर Meta-मंजूर template message लागतो — आधीच ठरलेला मजकूर-साचा, Meta कडून एकदा मंजूर करून घ्यावा लागतो.
उदा. "तुमच्या [एजंट]चं नूतनीकरण [तारीख] ला होणार आहे" — चौकोनी कंसातली जागा प्रत्येक वेळी भरली जाते, पण मूळ वाक्यरचना ठरलेली असते व बदलता येत नाही. एकदा Meta कडून मंजूर झाला की तोच साचा पुन्हा-पुन्हा वापरता येतो.
AI च्या रोजच्या उत्तरांना हा नियम लागू होत नाही, कारण तिथे ग्राहकानेच आधी संदेश पाठवलेला असतो. फक्त तुमच्या वतीने स्वतःहून-पाठवलेल्या सूचनांना template लागतो — गरज पडल्यास आम्ही याबाबत मार्गदर्शन करतो.
याबद्दल अधिक प्रश्न असतील तर थेट विचारा.
Trial सुरू कराहे उत्तर उपयोगी वाटलं का?